आम्ही गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही तर प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो

अध्यक्षाचे मनोगत

आपली संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती, मुला मुलींना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विना मूल्य प्रवेश देते.प्राथमिक आश्रम शाळा नाईक नगर उदगीर या आश्रम शाळेची सुरुवात १९८८ साली झाली आणि आजपर्यंतच्या काळामध्ये या शाळेतून हजारो विधार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.

Learn More

श्री देशमुख अनंत

मुख्याध्यापक

शाळेविषयी

निसर्गरम्य वातावरण सर्व भौतिक सोई सुविधानियुक्त वातावरणात अनुभवी शिक्षकवृंदा मार्फत आनंदाई शिक्षण आमचा शाळेत दिले जाते.निवासासाठी वस्तीग्रहामध्ये विध्यार्थासाठी सर्व सोई सुविधाची व्यवस्था करण्यात आली आहे .वस्तीगृह अधीक्षक व सर्व कर्मचारी बालकावर पूर्णवेळ लक्ष ठेतात .

शाळा व वसतिगृहाचे वैशिष्टये :

  • सुसज्ज इमारत, शालेय परिसर C.C.T.V. च्या नजरेत
  • निसर्गरम्य वातावरण
  • शालेय परिपाठ नियमीत
  • नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना मोफत निवासी भोजनाची उत्तम सोय
  • मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश व शालेय साहित्य
  • तंज्ञ अनुभवी शिक्षक वृंद
  • फी नाही, डोनेशन नाही, मोफत प्रवेश
  • शिष्यवृत्ती परिक्षेत हमखास यशाची परंपरा
  • सुसज्ज ग्रंथालय, अद्यावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष
  • मुलींच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था, व २४ तास महिला कर्मचारी
  • स्वतंत्र सांस्कृतीक हॉल, बालसभा, आदर्श पाठ, शैक्षणिक सहलीचे आयोजन
  • कवायत, योगासन, लेझीम, झांजपथक व स्काऊट गाईड
  • पालकमेळावा व स्नेहसंम्मेलन यांचे आयोजन
  • दर रविवार व मंगळवारी नॉनव्हेज
  • मुलांचे कपडे धुण्याची व्यवस्था, संध्याकाळी नाईट क्लासची व्यवस्था
  • सुसज्ज स्नानगृह, शौचालय, अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय. पिण्यासाठी फिल्टर पाण्याची सोय.
  • जेवणात सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी: जेवण तसेच प्रत्येक सण साजरा केला जातो.
  • खेळण्यासाठी भव्य क्रिडांगण
  • लाईट गेल्यास इन्व्ह्टरची व्यवस्था.
  • प्रत्येक रुममध्ये पलंग, गादी, उशीची व्यवस्था
  • प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
  • आठवड्याला वैद्यकिय तपासणी केली जाते

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त